एमआयएमच्या शहराध्यक्षपदी भगवान गंगावणे तर तालुका उपाध्यक्षपदी आसिफ शेख यांची नियुक्ती
साप्ताहिक तिरंगी न्यायालय / प्रतिनिधी - फुलंब्री ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन च्या फुलंब्री शहर अध्यक्षपदी भगवान गंगावणे तर फुलंब्री तालुका उपाध्यक्षपदी आसिफ शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सदरील नियुक्ती एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष समीर साजेद बिल्डर यांच्या आदेशानुसार तालुका अध्यक्ष हाफिज सय्यद रज्जाक यांनी केली आहे. सदरील नियुक्तीचे पत्र फुलंब्री-सिल्लोड पक्ष निरीक्षक बबलूशेठ यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी रणजित वाहूळ, किशोर गंगावणे, बाबासाहेब बहादूर, दिनेश खंडागळे, कलीम शहा, रामेश्वर प्रधान, राहुल दांडगे, विशाल गंगावणे, सुभाष गंगावणे, राहुल उबाळे, सलमान शेख, यश बोर्डे, बाळू गंगावणे, सय्यद जुल्फेखार आदी उपस्थित होते.