''सोशलमिडीया'' निवडणुक जिंकण्याचे प्रभावी माध्यम

ताई, बाई अक्का... चा आवाज कानावर पडला म्हणजे लक्षात यायच की, कोणत्यातरी नेत्याच्या प्रचाराची गाडी गावात आली आहे. हा प्रकार काही प्रमाणात आता जुना झाल्या सारखा वाटतो. निवडणुक म्हटल की, उमेदवारांच्या प्रचाराचे नव-नविन फंडे पहायला मिळतात. गावागावात रिक्षांवर लागलेले भोंगे, प्रचाराचे मो'- मो'े होल्डींग, प्रिटेड मटेरीअल या सोबतच प्रत्येक गावात जावून कार्यकत्र्यांच्या बै'का होत असे. गावागातील कट्यावर बसुन पान सुपारी खात माणसे संबंधीत नेत्या विषयी चर्चा करायची आणि यातुन नेत्यांची इमेज तयार व्हायची. ज्याचा फायदा नेत्यांना निवडणुकीत व्हायचा! हळुहळू ग्रामिण भागातील चित्र आता बदलायला लागल्याच दिसतय. ताई, बाई, अक्काचा... घोषणा आता ऐकायला मिळत नाही. होल्डींग दिसत असले तरी, त्यावरील मजकुर आता बदलत चालला आहे. प्रिंटेड मटेरीअल ही आता हायटेक होत चाललेले आहे. आताही मतदार पारावर जमतात, आणि त्यात तरुणांची संख्या जास्त प्रमाणावर आहे मात्र आता येथे पान सुपारी शेअर केली जात नाही तर येथे वायफाय शेअर केला जात असल्याच चित्र पहायला मिळते. पुर्वी नेत्यांच्या घोषणांविषयी चर्चा व्हायच्या...