फुलंब्री तालूक्यातील हिरकणी...!

कोलते टाकळी येथील महिलेने जपला शेतीचा वसा ! 


भारतातील महिला जगाच्या नकाशावर आपल आणि आपल्या देशाच नाव कोरत आहेत. अनेक क्षेत्रात महिला आता आपला वेगळा ठसा उमटवून स्वता:ची वेगळी 
ओळख निर्माण करीत आहेत. ऑलिम्पिक मधील सहभाग असो विंâवा चंद्रावरील मोहीम असो महिलांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडलेली आपण पाहीले आहे, मात्र बैलजोडीच्या सहाय्याने शेतीची वखरणी, नांगरणी करणारी महिला आपण पाहिली आहे ? फुलंब्री तालूक्यातील कोलते टाकळी येथील ४० वर्षीय सुमनबाई सोनवणे या स्वत: शेतातील सगळी कामे करीत आहेत. त्यांच्या या कामाने ग्रामीण भागातील फक्त 
महिलाच नव्हे तर शेती पासून दूर जाणाNया शेतकNयांसमोर एक आदर्श उभा रहावा म्हणुन स्वातंत्र्यदिना निमित्त्त घेतलेला आढावा.


भारत हा कृषी प्रधान देश, भारतातील निम्यापेक्षा जास्त लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच मानला जातो. मात्र आजही शेतीवर महिलांच्या प्रमाणात पुरुषांचीच मत्त्तेदारी मानली जाते. याचा अर्थ हा नाही की, महिला शेतीचे काम करीत नाही म्हणुन. महिलांना शेतातील काम करावी लागतात मात्र ती पुरषांप्रमाणे नांगरणी, शेतीच्या मशागतीती
ल जड काम जी की पुरुषांची मानली जातात ती काम मात्र महीला नाही करत असा समज आहे. मात्र याला अपवाद म्हणजे सुमनबाई रघुनाथ सोनवणे, ज्या आज दहा वर्षा पासून स्वत:च्या हिमतीवर शेती संभाळत आहेत.
फुलंब्री तालूक्यातील कालते टाकळी येथील रहीवाशी असलेल्या सुमनबाई सोनवणे यांना लहाणपाना पासून शेतीच्या कामात आवड राहीललेली आहे. माहेरी असतांना त्यांना शेतात काम करावे लागत असे. परिस्थिती आणि गरज यातून त्यांचा शेतीकडील कल अधीकच वाढत गेला आणि जमिनी सोबत एक जिव्हाळ्याच नात जोडल्या गेल. आणि ते आजही टिकून आहे. आज मितीला त्या सहा एकर जमिन स्वत: हिमतीवर कसत आहे. आणि नुसत्या कसतच नाही तर त्यांना या कामातून त्यांना भरघोस उत्पन्नही मिळत आहे. म्हणजे त्या हा व्यवसाय यशास्वीरित्यापार पाडत आहे.
शेतीसारखा किचकट व्यवयाय आता परवड नाही, अस आपनाला संपुर्ण मराठवाड्यात कुठही गेलात तरी ऐकाला मिळल. कृषीप्रधान देशातील शेतकNयांचा दृष्टीकोण आता बदलत चालला आहे. शेतकNयांच्या आत्महत्यांमूळे तर आता शेतकरी पुर्णपणे खचले आहे त्यात सरकारची उदासीनता त्यात भर टाकण्याचे काम करित आहे. निसर्गाची ओढ, शासनाची उदासीनता, शेतीमालाला मिळत नसलेला भाव यामुळे आता शेतकNयांची मानसिकता बदलत चाललेली दिसते आणि याचा परिणाम म्हणुन सुमनबाई सोनवणे यांचे पती रघुनाथ सोनवणे यांनी देखील शेती न करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाचा सुमनबाई सोनवणे यांच्यावर तिळमात्रही फरक पडला नाही. या निर्णयाने त्या खचल्यानाहीत तर त्यांनी मोठ्या जिद्दीने शेतीतील  पूर्ण कामे संभाळली.
महिला आज विविध क्षेत्रात आपला ठसा यशस्वी पणे उमटवत आहे. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी महिलांची आहे. अनेक आव्हाणात्मक कामे पुरुषांपेक्षा महिला अनेक सरस पध्दतीने करतांना दिसत आहे. मात्र खंत हिच आहे कि, हे सर्व चित्र शहरात पहायला मिळते. ग्रामिण भागात शिक्षण पुर्ण पणे पोहोचलेले असले आणि मुली शिक्षणात सरस कामगीरी करीत असल्या तरीही खेड्यातील विचारसरणी आजही पुर्णपने
बदललेली नसल्याचे चित्र आपल्याला पहायला मिळेल.
महात्मा ज्योतीबा फुले, क ्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू महराज यांनी सदैव स्त्री शिक्षण आणि स्त्री सक्षमीकरणाचे विचार मांडले. सुमनबाई सोनवणे यांच्या कडे पाहील्यानंतर या महापुरुषांचे विचार आता खेड्या पाड्यातही पोचलेले आपणाला दिसते.
सुमनबाई सोनवण यांना दोन मुले व दोन मुली असे चार अपत्य आहेत आणि ही चारही मुल वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सुमनबाई सोनवणे यांनी स्वता:हाला कमी
समजणाNया महिला, शेती पासुन दुर जाणारे व आत्मविश्वास खचलेले शेतकरी आणि शेतीच्या कामामुळे मुलांना शिक्षणापासुन दुर ङ्खेवणारे माता पिता यांच्या सर्वांसमोर एक उत्त्तम आदर्श ठेवला आहे.


Comments

Popular posts from this blog

''सोशलमिडीया'' निवडणुक जिंकण्याचे प्रभावी माध्यम

एमआयएमच्या शहराध्यक्षपदी भगवान गंगावणे तर तालुका उपाध्यक्षपदी आसिफ शेख यांची नियुक्ती