''सोशलमिडीया'' निवडणुक जिंकण्याचे प्रभावी माध्यम
ताई, बाई अक्का... चा आवाज कानावर पडला म्हणजे लक्षात यायच की, कोणत्यातरी नेत्याच्या प्रचाराची गाडी गावात आली आहे. हा प्रकार काही प्रमाणात आता जुना झाल्या सारखा वाटतो. निवडणुक म्हटल की, उमेदवारांच्या प्रचाराचे नव-नविन फंडे पहायला मिळतात. गावागावात रिक्षांवर लागलेले भोंगे, प्रचाराचे मो'- मो'े होल्डींग, प्रिटेड मटेरीअल या सोबतच प्रत्येक गावात जावून कार्यकत्र्यांच्या बै'का होत असे. गावागातील कट्यावर बसुन पान सुपारी खात माणसे संबंधीत नेत्या विषयी चर्चा करायची आणि यातुन नेत्यांची इमेज तयार व्हायची. ज्याचा फायदा नेत्यांना निवडणुकीत व्हायचा! हळुहळू ग्रामिण भागातील चित्र आता बदलायला लागल्याच दिसतय. ताई, बाई, अक्काचा... घोषणा आता ऐकायला मिळत नाही. होल्डींग दिसत असले तरी, त्यावरील मजकुर आता बदलत चालला आहे. प्रिंटेड मटेरीअल ही आता हायटेक होत चाललेले आहे. आताही मतदार पारावर जमतात, आणि त्यात तरुणांची संख्या जास्त प्रमाणावर आहे मात्र आता येथे पान सुपारी शेअर केली जात नाही तर येथे वायफाय शेअर केला जात असल्याच चित्र पहायला मिळते. पुर्वी नेत्यांच्या घोषणांविषयी चर्चा व्हायच्या आणि एकणारे त्या लक्ष पुर्वक ऐकायचे कारण त्यांना कामाच्या दगदगीत या सर्व प्रचाराचा भाग होता येत नव्हत, मात्र आता श्रोत्यांची संख्या हळुहळू कमी होत आहे, कारण आता दुनिया मुठ्ठीत आल्यान सर्वच बारीकसारीक गोष्टी गल्लीपासुन ते दिल्ली पर्यतच्या सर्व खबरा सर्वांना माहित असतात. खरच टेक्नॉलॉजीने व्र्रâांती केल्याची आपणाला म्हणता येईल. आता ग्रामीण भागातही मोबाईल, इंटरनेट ह्या रोजच्या गरजा बनत चालल्या आहेत.
पुर्वी राजकारणात कुटनितीक व्यवहार आणि प्रोफेशनलिज्म महत्वाचा होता मात्र आता चित्र पालटायला सुरवात झाली आहे. तंत्रज्ञान महत्त्त्वाचा भाग बनत चालला आहे. पुर्वी नेत्यांना आपली प्रतीमा बनविण्यासा'ी क'ोर मेहणत करावी लागत होती. दांडगा जनसंपर्क उभा करण्यासा'ी अनेक परिश्रम घ्यावे लागत होते. केलेल्या कामाच्या माध्यमातून नेता आपल्या मतदाराच्या मनात घर करीत असे. काही वेळेला अनेक नेते आपण केलेली कामे ही जनते पर्यंत पोहोचवू शकत नव्हते. मात्र आता डिजिटल युगात हे काम अगदी सोपे झाले आहे. इंटनेट, मोबाईच्या, फेसबुक, व्हाटसअॅप, व्टिटर च्या माधमातून आपले काम जनते पर्यंत पोहोचवू शकतात. कार्यकत्र्यांशी टच मध्ये राहू शकतात आणि सामान्य मतदारामध्ये आपली प्रतिमा उभारु शकतात. या सर्व गरजांमुळे फक्त समाजातच नाही तर राजकारणातही सोशल मिडियाचा प्रभाव वाढत चालला आहे.
पुर्वी परंपरागत राजकिय कार्यकर्ते प्रत्येक घरी जावून आपल्या नेत्यांची पतीमा तयार करण्याचे काम करीत असत मात्र आता सोशिअल मिडियाच्या माध्यमातून हे काम सोपे झाले आहे. भारतीय राजकारणाच्या इतिहासात प्रथमता राजीव गांधी यांनी अशा माधमाचा वापर केला होता. त्या काळी त्यांनी आपल्या पक्षाच्या प्रचारचे साहित्य तथा जाहिरात बनविण्याचे काम जाहिराज संस्था रीडिप्âयूजनला दिले होते.
राजकीय क्षेत्रात डिजिटल मार्केटिंग चा प्रभाव वाढतच चालला आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे प्रशांत किशोर ! प्रशांत किशोर यांनी सोशीअल मिडियाच्या माध्यमातून केलेल्या कामाचा प्रभाव सर्व प्रथम १६ मे २०१४ ला समोर आला होता. जेव्हा नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणाचे सर्व तवर्â मोडीत काढत, लोकसभेत एकहाती सत्त्ता मिळवीली. त्यानंतर लगेचच संपुर्ण भारतात मोदी फिवर असताना, बिहार विधानसभा निवडणुकित
नितिश कुमार यांनी मिळवलेला विजय हा सोशिअल मिडियाचीच कमाल होता. नरेंद्र
मोदींची चाय पे चर्चा, नितिश कुमारांचा
बिहारी बनाम बिहारी आणि आता पंजाब मध्ये कॅप्टन अमरिन्दर सिंह सा'ी पंजाब का कॅप्टन या सारखे नारे सोशिअल मिडियावर पसरने हिच सोशिअल मिडियाचीच ताकद आहे. याचा सर्वात प्रथम यशस्वी प्रयोग अमेरीकी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी २००८ मध्ये केला होता. २००७ पर्यंत बराक ओबामा अमेरिकेच्या दृष्टीत एक साधारण सिनेट होते. त्यांच्या टिमने अशा प्रकारे डाटा बेस तयार केला, की त्यांनी २००८ मध्ये झालेल्या अतेरिकी राष्ट्रअध्यक्ष पदाच्या निवडणुकीत इतिहास रचला. या निवडणुक सोशिअल मिडियाचा इतका प्रभाव पहायला मिळाला की, या निवडणुकीला ‘फेसबुक इलेक्शन्स ऑफ २००८’ असे म्हणल्या गेल. या तुन निवडणुकीतील सोशिअल मिडयाचा प्रभाव दिसुन येतो, ज्याने राजकारणातील दिग्गजांना मागे पाडल. आज घडीला भारतातील राजकिय नेते या गोष्टीला चांगल्या प्रकारे समजलेले आहे. या मुळच २००९ पर्यत शशी थरâर हेच एकमेव नेते होते. जे सोशीअल मिडियाचा वापर करत होते, मात्र फक्त पाच वर्षात असा एकही नेता नाही कि जो, सोशिअल मिडियाचा वापर करीत नाही.
सोशिअल मिडिया हा सामान्य माणुस आणि राजनेता दोघांसा'ी पर्वणीच 'रला आहे. जिथे एकीकडे प्रचारासा'ी प्रिंट मिडिया व इलेकक्टॉनिक मिडिया वर अवलंबून राहणे कमी झाले. तर दुसरीकडे सामान्य माणसाला आपला आवाज राजकारण्यांपर्यत पोहोचविण्याचे एक प्रभावशाली माध्यम बनले. जो अभिव्यक्तीची मुळ शोधत होता त्याला आपले विचार मांडण्यासा'ी हक्काचे व्यासपि'च मिळाले.
वैभव दादासाहेब काळे -
Comments