कोरोना काळात करा भविष्यातील पैशाचे नियोजन!


   

 लॉकडाउनमुळे उत्पन्नाचा मार्ग बंद असल्याने सर्वांनाच अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष करुन मध्यमवर्गीयांवर याचा सर्वात जास्त परिणाम पहायला मिळत आहे. आणि याला कारणीभूत ठरत आहे पैशाच्या बाबतीत नसलेले नियोजन. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा आपल्यावर वाईट परिणाम होउ नये यासाठी आपण पुढील काही गोष्टींच्या आधारे पैशाचे नियोजन करु शकतो.  

कर्जाचे नियोजन
भविष्यात कर्जाच्या नियोजनावर विशेष लक्ष केंंद्रीत करावे लागणार आहे. क्रेडिट कार्ड मिळालेल्या ऑफर्सवर अनावश्यक खरेदी करणे, गरज नसतांना वेगवेगळया स्वरुपातील कर्ज घेने या सवयी आपल्याला भविष्यात अडचणीच्या ठरु शकतात. लॉकडाउनमुळे पैसा येण्याचे सारे मार्ग बंद आहेत आणि त्यातच घेतलेल्या कर्जाचे व्याज वाढत आहे. यामुळे लॉकडाउन नंतरही अडचनी पिच्छा सोडणार नाही असे वाटते. भविष्यातील येणा-या अशा संकटांच्या आगोदर कर्जाचे नियोजन करणे गरजेचे बनले आहे. अनावश्यक कर्ज घेने टाळने अपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करण्याची सवय लावने आपल्यासाठी फायदयाची ठरु शकते.


बचतीची सवय
कोणत्याही कठीन परिस्थितीचा सामना करत असतांना आपल्या जवळ पैसा असल्यास जास्त अडचणी येत नाही. आणि आताच्या कोरोना काळात जवळ असलेल्या पैशाला अधीक महत्त्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे पैशाच्या बचतीचे महत्त्त्व आनखी वाढणार आहे. भविष्यातील समस्यांचा विचार करुण, आपल्या उत्नन्नातील काही भाग बचत करण्याची सवय आपल्याला लावावी लागेल. ज्यामुळे आपल्याला भविष्यात येणा-या अडचणींची अधीक चिंता करण्याची गरज भासणार नाही.

विविध ठिकाणी गुंतवणुक करणे
लॉकडाउनमुळे आपला व्यवसाय ठप्प पडला आहे. यामुळे आपल्याकडे येण्या-या पैशाचे मार्गही बंद झाले आहेत. असे का झाले याच आपण कधी विचार केलाय? आपल्याकडे उत्पन्नाचे एक किंवा दोनच साधन आहे. ज्यांच्या कडे उत्पन्नाचे अधिक साधन आहेत त्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी झालेल्या आहेत. कुठल्यातरी मार्गाने त्यांचा कडे येणारा पैसा हा सुरु आहे. उदाहरण म्हणजे काही लोकांनी शॉप विकत घेउन ते दुकानदारांना भाडेतत्वावर दिले आहेत. यातून त्यांची कमाइ सुरु आहे. काही लोकांनी आपला पैसा व्याजाने दिला आहे त्यातून त्यांना व्याज मिळते आहे. एका व्यवसायावर अवलंबून राहता अशा अनेक ठिकानी आपन गुंतवणूक करु शकतो. यात सोने, जमिन, शेअर मार्केट, विविध व्यवसाय असे असंख्य पर्यांय आहेत.

(लहान व्यवसायीकांना व्यवसायात पुढे जाण्यासाठी माहिती, मार्गदर्शन, ‘सेल्स आणि मार्केटिंगटिप्सची आवश्यकता भासत असते. तुम्हाला हे सर्व मराठीमधून उपलध्द व्हावे, तुमचा व्यवसाय करण्यासाठी आत्मविश्वास वाढावा याहेतूने आमच्या टिमने हा ब्लॉग सुरु केला आहे. याच्या माध्यतातून तुम्हाला व्यवसायीक स्टोरी, बातमी, पुस्तकाचे परिक्षण, यशस्वी व्यवसायीकांच्या कहाण्या त्यांचे विचार वाचायला भेटतील. आशा करतो आपल्याला हा प्रयत्न नक्किच आवडेलआमचे पुढे येणारे सर्व लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉगला सबस्काइब करा आणि फेसबूक पेजला लाईक करा.)  

Comments

Popular posts from this blog

''सोशलमिडीया'' निवडणुक जिंकण्याचे प्रभावी माध्यम

एमआयएमच्या शहराध्यक्षपदी भगवान गंगावणे तर तालुका उपाध्यक्षपदी आसिफ शेख यांची नियुक्ती