श्रीमंत होण्याचे तीन सोपे नियम! प्रत्येक उद्योगपती आपल्या जीवनात करतो यांचा अवलंब


श्रीमंत होण्याची इच्छा प्रत्येकाचीच असते. सर्वांना वाटते की त्यांच्या कडे खुप पैसा असावा, आवडणा-या सर्व गोष्टी त्यांच्या कडे असाव्यात. यासाठी ते खुप मेहनतही करत असतात मात्र प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होत नाही. असे का? का काही लोक काम न करताही पैसा कमावतात आणि काही लोक खुप मेहनत करुनही श्रीमंत होत नाही? श्रीमंत लोक असे काय करता की, ते आणखी श्रीमंत होतात? आपनही श्रीमंत होण्यासाठी काय करावे हे आपण पाहू एका कहाणिच्या माध्यमातून.
ही काहाणी आहे, प्राचीन काळातील सर्वांत श्रीमंत शहर 'बेबिलॉन' येथील. या शहरात बन्सिर नावाचा रथ बनवारा व्यापारी राहत होता. राजाच्या राजवाडया जवळच त्याचे छोटेसे घर होते. त्या दिवशी बन्सिर खुप उदास झाला होता. बन्सिर आपल्या रथ बनवायच्या कामात व्यस्त होता. तेव्हा त्याचा मित्र कोबी तेथे आला. कोबी त्याच शहरातील संगीतकार होता. बोलता-बोलता कोबी बन्सिरला म्हणाला की, आपण जगातील सर्वांत श्रीमंत शहरात राहतो तरिही आपण गरीब आहोत.
या शहरात येणारे सगळे लोक म्हणतात की, या शहरात खुप पैसा आहे. अर्धे आयुष्य या शहरात घातले, खुप मेहनत केली तरीही आपण गरीबच राहीलो. अस वाटल होत माझी मेहनत बघून देव मला एके दिवशी श्रीमंत नक्की करेल मात्र तसे काही झाले नाही. मला अस गरीब बनून नाही रहायच. मला देखील खुप पैसा कमवायचा आहे.
यावर बन्सिर कोबीला म्हणाला, माझी परिस्थितिही काही वेगळी नाही. पण आपण श्रीमंत कसे होणार?
कोबी म्हणाला श्रीमंत होण्याचा मार्ग तर आपल्याला एखादा श्रीमंत व्यक्तीच दाखवू शकतो.
तेव्हा बन्सिर म्हणाला, मी सकाळीच आपला लहाणपनीचा मित्र अर्कडला पाहिलं, तो शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झालाय. आणि मला त्याचे घर देखील माहित आहे.
कोबी तात्काळ म्हणाला ठरल तर मग, अर्कडकडे जायचं आणि श्रीमंतीचा मार्ग माहित करुन घ्यायचा.
अर्कड बेबीलॉन शहरातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होता. त्यांच्याकडे सोन्याचा रथ होता! दरवर्षी तो खुपसारा पैसा दान करायचा! तरी सुध्दा त्याचा पैसा वाढतच जायचा.

दुस-या दिवशी ठरल्या प्रमाणे ते दोघे आपल्या अन्य काही मित्रांना घेउâन अर्काडच्या घरी गेले.
तेथे गेल्यानंतर ते अर्काडला म्हणाले, अर्काड तु खरच खुप भाग्यशाली आहेस. आपन सर्वजन एकाचा शाळेत शिकलो, सोबत खेळलो. त्यावेळेस नाही तु अभ्यासात हुशार होतास, नाही खेळात... तरी सुध्दा आज तू इतका श्रीमंत झालास आणि आम्हाला तर दररोजचे खर्च भागवने देखील अवघड झाले.
त्यावर अर्काड म्हणाला, तुमच्या या परिस्थितीचे कारण आहे की, तुम्ही इतक्या दिवसात पैसा वाढवण्याच्या नियमाबद्दल काहीच नाही शिकले. तुम्हाला तर माहित आहे की मी छोटया व्याप्याराचा मुलगा होतो. मी ही गरीब परिवारातून आलो आहे. मात्र श्रीमंत होण्याची माझी मनापासून इच्छा होती,  आणि मला माहित होतं यासाठी मला माझा वेळ दयावा लागेल आणि अभ्यास करावा लागेल. जेव्हा मला श्रीमंत होण्याचे नियम माहित होतील तेव्हा त्यांचा अवलंब आपल्या जीवनात करावा लागेल. याच काळात मला एका ठिकाणी लिहण्याची नोकरी मिळाली.’’
एका दिवशी एक ''मनी लॅन्डर'' जे की सावकार होते त्यांच नाव  होत ‘अल्गमेश’. ते माझ्याकडे आले त्यांनी मला एक नियम लिहून देण्यास सांगितला. जातांना ते म्हणाले हा नियम मला दोन दिवसात लिहुन दे. तु मला दोन दिवसात हा नियम लिहुन दिला तर ती तुला दोन कॉपर देईल.
मात्र तो नियम खुप मोठा होता. तो दोन दिवसात झाला नाही. ‘अल्गमेश’ माझ्याकडे तेव्हा ते काम अर्धवट होते. ते खुप रागावले. मी त्यांना म्हणालो तुम्ही खुप श्रीमंत आहात, मला श्रीमंत होण्याचे नियम सांगा मी सकाळ पर्यंत तुम्हाला तुमच काम करुन देईल. ‘अल्गमेश’म्हणाले तर ठिक आहे सकाळ पर्यंत
माझे काम पुर्ण झाले पाहीजे. दुस-या दिवशी सकाळी ‘अल्गमेश’आले तेव्हा काम संपले होते. ‘अल्गमेश’ खुश झाले आणि म्हणाले तू तुझ काम केलस आता माझ काम, तुला वाटेल की मी कामाचा खुप कमी मोबदला देतोय मात्र मी सांगीतलेल्या गोष्टी नीट समजावून घेतल्यास तर तुझ्या लक्षात येइल की, त्या किती मोलाच्या आहे. ज्याचा आपल्या जीवनात अवलंब करुण तू श्रीमंत होउâ शकतोस.
नंतर अल्गमेशने अर्काडला एक प्रश्न विचारला, तू कमावत असलेल्या पैशाचा किती हिस्सा स्वत:ला देतोस. त्यावर अर्काड म्हणाला 'मी सगळे पैसे स्वता:हाला देतो'
अल्गमेश म्हणाला ते पैसे तू कपडयावाले, किराणा वाले किंवा अन्य कोनी त्यांना देतोस, स्वत:ला देत नाही. यातुन जे पैसे उरतात ते आहे तुझे गूलाम त्यांना कामाला लाव आणि त्यांच्या पासुन होणा-या मुलांना पन कामाला लाव.
''याचा अर्थ श्रीमंत होण्याचा पहिला नियम आहे, आगोदर स्वता:हाला पैशाचा काही हिस्सा दया आणि नंतर त्यांला कामाला लाव.'' एवढ सांगून ‘अल्गमेश’ तेथुन निघुन गेले.
एक वर्षानंतर अल्गमेश पुन्हा अकर्डला भेटले आणि त्यांनी अर्कडला विचारल तु काय प्रोग्रेस केली आहे.
त्यावर अल्गमेश म्हणाला, मी माझ्या महिन्याच्या कमाईचा दहा टक्के हिस्सा स्वता:हाला दिला. याचा माझ्या जीवनात थोडसा फरक पडला. या काळात जमा झालेल्या पैशाने मला वेगवेगळया वस्तू घ्या वाटल्या, मात्र मी ते टाळले. नंतर मी ते पैसे अजमर नावाच्या एक विट बनवीना-या व्यापा-याला दिले. तो म्हणला की तो दुर समुद्रापार जातोय, तेथुन सोन्याचे दागिने विकत आणेल. नंतर ते जास्त किंमतीत विकून पैसे वाटून घेउâ.
त्यावर अल्गमेश म्हणाला, दागीन्यांच्या माहिती बद्दल आपण एका विट बनवीणा-यावर कसा विश्वास ठेउ शकतो. तुझे जमा झालेले पैसे तर गेले आता तुला परत सुरवात करावी लागेल. आणि अल्गमेश म्हणाला तसचं झाल, समुंद्रा पलिकडील व्यापा-यांनी अजमेरला बनावट सोन्याचे दागीने दिले. या गलती कडून शिकुन अर्काड पुन्हा कामाला लागला. आता तर त्यांला दहा टक्के जमा करण्यची सवय लागली होती.

अर्काड म्हणाला हा मला शिकायला मिळालेला दुसरा नियम होता, ''कोणत्याही गोष्टीची माहिती त्यालाच विचारा जो त्यांत एक्सपर्ट आहे जसे सोन्याची बरोबर माहिती सोनाराच देउ शकतो.''
परत एक वर्षाने अल्गमेश अर्काडला भेटले त्यांनी परत अर्काडला तोच प्रश्न विचारल की, आता काय प्रोग्रेस आहे. त्यावर अर्काड म्हणाला की प्रत्येक महिण्याला कमार्ईचा दहा टक्के भाग जमा केला. तो पैसा मी 'अगर' नावाच्या एका ढाल बनवीणा-या व्यापा-याला ब्रॉस विकत घ्यायला दिला आहे. तो प्रत्येक चार महिण्याला त्याचे व्याज देतो. त्यावर अल्गमेश म्हणाले तू त्या व्याजाच्या पैसाचं काय करतो? अर्काड म्हणाला ते मी माझ्या परिवारासाठी खर्च करतो. त्यावर अल्गमेश हसले आणि म्हणाले, तु तुझ्या बचत झालेल्या पैशाच्या मुलांना वाया घालवत आहे. जर तू तुझ्या जमा झालेल्या पैशाच्या मुलांना असे वाया घालवशिल तर त्यांच्या पासून पैसे कसे कमावशिल आणि त्यांच्या मुलांच्या मुलांपासुन पैसे कसे कमावशिल. पहिले आपली बचत आणि त्यांच्या मुलांची एक मोठी फैज जमा कर आणि नंतर आपले शौक पुर्ण कर.
अर्कड म्हणतो, हा तो श्रीमंत होण्याचा तिसरा नियम आहे की, तुम्ही तुमच्या बचत केलेल्या पैशाची गुंतवणुक करा, नंतर त्यापासुन आलेल्या पैशाचिही गुंतवणूक करत रहा. हे तो तोपर्यंत करत रहा जो पर्यंत तुम्ही गुंतवणूकिची एक मोठी फैज उभी करत नाही.
  शेवटी अर्काड आपल्या मित्रांना म्हणाला, जीवनाचा पुर्ण आनंद घ्या, जास्त पैसे बचत करण्याचा नांदात आपल्या आयुष्याचे अनमोल क्षण वाया नका घालवू.

Comments

Popular posts from this blog

''सोशलमिडीया'' निवडणुक जिंकण्याचे प्रभावी माध्यम

एमआयएमच्या शहराध्यक्षपदी भगवान गंगावणे तर तालुका उपाध्यक्षपदी आसिफ शेख यांची नियुक्ती