कोरोना काळात करा भविष्यातील पैशाचे नियोजन!

लॉकडाउनमुळे उत्पन्नाचा मार्ग बंद असल्याने सर्वांनाच अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे . विशेष करुन मध्यमवर्गीयांवर याचा सर्वात जास्त परिणाम पहायला मिळत आहे . आणि याला कारणीभूत ठरत आहे पैशाच्या बाबतीत नसलेले नियोजन . भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा आपल्यावर वाईट परिणाम होउ नये यासाठी आपण पुढील काही गोष्टींच्या आधारे पैशाचे नियोजन करु शकतो . कर्जाचे नियोजन भविष्यात कर्जाच्या नियोजनावर विशेष लक्ष केंंद्रीत करावे लागणार आहे . क्रेडिट कार्ड मिळालेल्या ऑफर्सवर अनावश्यक खरेदी करणे , गरज नसतांना वेगवेगळया स्वरुपातील कर्ज घेने या सवयी आपल्याला भविष्यात अडचणीच्या ठरु शकतात . लॉकडाउनमुळे पैसा येण्याचे सारे मार्ग बंद आहेत आणि त्यातच घेतलेल्या कर्जाचे व्याज वाढत आहे . यामुळे लॉकडाउन नंतरही अडचनी पिच्छा सोडणार नाही असे वाटते . भविष्यातील येणा - या अशा संकटांच्या आगोदर कर्जाचे नियोजन करणे गरजेचे बनले आहे . अनावश्यक...