कोरोना काळात करा व्यवसायाचे योग्य नियोजन! लहान व्यवसायीकांसाठी विशेष टिप्स...
कोरानाचा मुक्काम अजुनही वाढतोय आणि याबरोबरच वाढतोय आपला लॉकडाउन.... लॉकडाउनवाढल्यामुळे आपला घरातील मुक्कामही वाढला आहे. अजुन काही दिवस आपल्याला घरातच रहावे लागेल यात काही शंका नाही. सहाजिकच घरात राहून बोर होतय आणि सोबतच आपल्या व्यवसायाची चिंता सतावते आहे.
कोरोनाने जगभरातील अर्थशास्त्राची सारीच गणितं बदलुन टाकली आहेत. यात आता लहान व्यवसायीक कुठे असतील ? अचानक आलेल्या कोरानारुपी संकटाने लहान व्यवयसायीकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाला नुसता कोरोनाच कारनीभुत आहे का ? या प्रश्नाचा निट विचार करण्याची वेळ लहान व्यवसायीकांवर आली आहे. आजची परिस्थिती आपल्या हाताबाहेर आहे, आपन काहीच करु शकत नाही शिवाय घरात बसुनराहण्याच्या, असा विचार अनेक व्यवसायीक करत आहेत. भविष्यात पुन्हा अशी संकट आल्यास व्यवसायाला सुरक्षित ठेवण्यासाठी काय करायला हवे? हा प्रश्न देखील त्यांना सतावतोय.
कोरोनाने हे दाखवुन दिलय की, या नंतर व्यवसायीकांनी आणि विशेषकरुन लहाण व्यवसायीकांनी कोनत्याही आव्हाणापासुन आपल्या व्यवसायाला वाचवण्यासाठी तयार असाव. मोठे व्यवसायीक आपल्या व्यसाचे योग्य व्यवस्थापन करत असतात मात्र लहान व्यवसायीकांमध्ये याचा अभाव दिसुन येतो. आणि यामुळेच अनेक लहान व्यवसायीकांना आपल्या व्यवसायात नुकसान सहन करावे लागते. अनेकांचे व्यवसाय तर बंद होण्याच्या उंबरठयावर येउन ठेपतात.
कोराना काळानंतर कसे असेल व्यवसायाचे स्वरुप आणि भविष्यात अशी परिस्थिती आली तर व्यवसायाला टिकउन ठेवण्यासाठी काय करता येईल ते आपन पाहू...
- एक मोठे दुकान भाडयाने घेने, त्यासाठी अॅडवान्स डिपॉजीट देने, चांगले फर्निचर करने, नंतर एखादया आपल्यापेक्षा मोठया व्यापा-याकडून सामान विकत घेने आणि आपल्या व्यवसाय सुरु करणे. ही झाली पारंपारिक व्यवसाय कण्यासाची पध्दत, आपल्याला या व्यवसायाला पर्याय शोधावा लागेल.
- कोरानाच्या प्रभावाने प्रत्येकाच्या जीवनावर मोठा परिणाम केला आहे. यामुळे कोरोना काळानंतर ग्राहकांच्या स्वभावामध्ये मोठया प्रमाणावा बदल झालेला आपल्याला दिसले. या स्वभावानुसार सेल्स आणि मार्केटींग मध्ये बदल करावा लागेल.
- कोरोना काळात तंत्रज्ञानाचा वापर मोठया प्रमाणात वाढला आहे. यामुळे जर आपन आपल्या व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर वाढवला नाही तर आपले येणा-या काळात नुकसान होउâ शकते.
- कोरोनाकाळ संपल्या नंतर ही दुकानांवर येणा-या ग्राकांची संख्या पुर्वी सारखी नसेल कारण त्यांच्या मनात भितीने घर करुण ठेवले आहे. यामुळे ग्राहकांचा कौल हा इ-कॉमर्स कंपन्यांकडे वाढलेला दिसतो आहे. आपणही आपल्या ग्राहकांसाठी असे काही करु शकतो का? याचा विचार आणि नियोजनही या काळात करता येउâ शकते.
- सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पैशाचे नियोजन... पैशाचे नियोजन हे व्यवसायाचे मुळ असते. लहान व्यापा-यांवर येवढया मोठया प्रमाणावर संकटकधी आले नव्हते. कोरोनाच्या संकटाने पैशाच्या नियोजनाचे महत्व अजून वाढले आहे.
- व्यवसायासाठी घेतले जानारे कर्ज! याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. व्यवसाय सुरुकरण्यासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी पैशाची गरज भासत असते आणि अनेकवेळा ती गरज कर्जाच्या माध्यमातुन भागविली जाते. व्यवसायासाठी कर्ज घेने वाइट नसले तरी कर्जाचे प्रमाण निश्चित करने गरजेचे आहे. कारन याचे परिणाम आपल्या व्यवसायावर होत असतात.
- आपल्या व्यवसायाठी लागणा-या चार महिण्याच्या पैशाचे नियोजन हे आघोरच करुन ठेवने.
- चार महिनेच का आणि चार महिण्याचे पैसे आणायचे कोठून ? असा प्रश्न नक्किच तुमच्या मनात आला असणार. तर चार महिनेच का?... याचे उत्त्तर आहे आपले ऋतू, आपले अधिकतर व्यवसाय हे ऋतूंवर अवलंबलेले असतात. उदाहरण म्हणजे, पावसाळयात काही व्यवसायातील ग्राहकांची संख्या कमी असते ती उन्हाळयात मात्र वाढलेली असते.
- काही काळात आपल्या ग्राकांचे प्रमाण वाढलेले असते. अशा वेळेला बरेचसे व्यवसायीक सिझन म्हणतात. तर अशा सिझनमध्ये ऑफसिझनसाठी पैसे काढून ठेवणे हे महत्त्त्वाचे. ज्यामध्ये आपल्या दुकानाचे भाडे, कर्जाचे हप्ते, घरखर्च आणि वयक्तीक खर्च याचे व्यवस्थित नियोजन करता येते.
- व्यवसायात कायम पैसा खेळता रहावा यासाठी एका पेक्षा अधिक पैशाचे स्त्रोत निर्माण करणे ही काळाची गरत बनली आहे.
- आपल्या ग्राहकांचा आवाका वाढवण्याची आवश्यकता निर्मान झाली आहे. जुन्या ग्राहकांबरोबरच नविन ग्राहक कसे वाढवता येतील याचाही अभ्यास आपन या लॉकडाउâनच्या काळात करु शकतो.
- नविन येणा-या व्यवसायीकांनी नविन पध्दती बरोबरच नविन व्यवसाय शोधण्याची गरज आहे. नविन येणारे व्यवसायीक आपल्या शहारात आगोदरच सुरु असलेले व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात. ते नविन काही करण्याचा प्रयत्नच करत नाहीत आणि हेच त्यांच्या अपयशाचे मोठे कारण ठरते.
- डिसेंबरच्या शेवटी चिनच्या वुहान शहरामध्यमध्ये प्रथम कोरांना विषाणू आढळला त्यानंतर चारच महिण्यात तो संपुर्ण जगात पोहोचला. यातुन आपल्या लक्षात येईल की, जग किती लहान झाले आहे. जगात दळनवळणाच्या सूवीधा किती वाढल्या आहेत. याचा आपन आपल्या व्यवसाठी कसा उपयोग करु शकतो याकडेही नविन येणा-या व्यवसायीकांनी बघायला हवे.
- विदेशात व्यवसायाच्या नवनविन पध्दती उदयाला येत आहेत त्याचा आपन आपल्या देशात व्यवसायासाठी उपयोग करु शकतो. यासोबतच तेथून अनेक वस्तू आणुन त्याची इथे विव्रâी करु शकतो आणि भरपुर नफा कमावू शकतो.
- यासाठी हवी फक्त आवश्यक माहिती, आणि आज इंटरनेटवर मोठया प्रमाणावर माहिती उपलब्ध आहे आणि आम्हिही आपल्या ब्लॉग माध्यमातून ती देण्याचा प्रर्यत्न करु. चलातर मग या लॉकडाउâनाचा उपयोग व्यवसायातील नविन गोष्टी शिकण्यासाठी आणि भविष्यातील व्यवसायाचे नियोजन करण्यासाठी करु.
(लहान व्यवसायीकांना व्यवसायात पुढे जाण्यासाठी माहिती, मार्गदर्शन, 'सेल्स आणि मार्केटिंग' टिप्सची आवश्यकता भासत असते. तुम्हाला हे सर्व मराठीमधून उपलध्द व्हावे, तुमचा व्यवसाय करण्यासाठी आत्मविश्वास वाढावा याहेतूने आमच्या टिमने हा बॉग सुरु केला आहे. याच्या माध्यतातून तुम्हाला व्यवसायीक स्टोरी, बातमी, पुस्तकाचे परिक्षण, यशस्वी व्यवसायीकांच्या कहाण्या त्यांचे विचार वाचायला भेटतील. आशा करतो आपल्याला हा प्रयत्न नक्किच आवडेल.
आमचे पुढे येणारे सर्व लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉगला सबस्काइब करा आणि फेसबूक पेजला लाईक करा.)
Comments